राजकारण

'50 खोके...' पडणार महागात? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊतांना न्यायालयाचे समन्स

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स बाजवण्यात आले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेसंजय राऊतांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स बाजवण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटावर मानहानीचा दावा केला होता. यावर सुनावणी करताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याची पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे.

खोके, गद्दार, एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह कित्येत रुपयांना विकत घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. याविरोधात राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांविरोधात दोन हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

यावर सुनावणी करताना न्यायालयाने सोशल मीडियावरचा मजकूर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्वतः न्यायालयात हजर राहून उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याप्रकरणी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊतांना समन्सही बजावण्यात आले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Kedar Dighe vs Eknath Shinde : Kopari Panchpakhadi Vidhansabha केदार दिघे एकनाथ शिंदेंविरोधात लढणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांची मोठी कारवाई: शस्त्रांसह आरोपी ताब्यात

Maharashtra Vidhansabha New Trend : राज्याच्या राजकारणात नवा ट्रेंड | एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे