राजकारण

चार राज्यांच्या निकालानंतर भाजपाचा सेलिब्रेशनचा प्लॅन, पंतप्रधान मोदी संबोधित करणार

Published by : Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या विजयाचे सेलिब्रेशन भाजपाच्या मुख्यालयात होणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा उपस्थिती असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळते आहे.

पहिल्या कलात भाजपने 155 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Badlapur Sexual Assault: बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर

Pune International Airport: पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे' नाव; राज्य सरकारचा निर्णय

Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...