त्यांच्या पक्षावरती मोठी आपत्ती कोसळली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुर्देवानं जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर आपत्ती कोसळली आहे. त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही. तिथेच त्यांचं आपत्ती, व्यवस्थापन फेल झालं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करता मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे नुकसान भरपाई वैगेर त्यांनी सुरु केले. पण हे ढोंग आहे शेतकऱ्यांना हे माहित आहे. हे वारंवार त्यांच्या बाबतीत अडीच वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते. खरं म्हणजे या राज्याच्या सगळ्या निधी विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा सामाजिक विभाग न्याय विभागाचा हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यावर आफत आली आहे. हे मी स्पष्ट सांगतो असे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
आपटे भेटत का नाहीत हे सांगावं जर आपटे सापडत नसतील त्यांना लूक आउट नोटीस जाहीर केली. लॉक आउट नोटीस जारी केली याचा अर्थ तो पोलिसांच्या हातात लागत नाही. मग या राज्यामधील गृहखात सरकार काय करतो. महाराष्ट्रातून ते जर पळून गेले असतील तर त्याला या सरकारने मदत केली आहे आणि जर पळून गेले नसतील आणि जर महाराष्ट्रात असतील तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा ती गेल्या काही दिवसांमध्ये गुंडांचा आश्रयस्थान झाला आहे. मंत्रालयाचा सहावा मजला, वर्षा असेल मी त्या संदर्भात एका फोटोची मालिका प्रसिद्ध केली मुख्यमंत्री यांच्याबरोबर. मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती तर वर्षा.. नसेल तर तुम्ही अटक करा.
तुम्ही आम्हाला अटक करता, आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, गुन्हे दाखल करता, आमच्यावर खोटे खटले दाखल करता मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने फुटला तोडला माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट जे सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी ते बजेट कुठे गेला आहे त्यांनाच माहिती हा पुतळा फक्त दहा ते पंधरा लाखातच बनला असं तज्ञांचा म्हणणं आहे. साधारण पुतळ्यावर पंधरा ते सोळा कोटीचा बजेट मंजूर झालं होतं असे संजय राऊत म्हणाले.