गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादेतील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. तर दुसरीकडे औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhajinagar) नामकरण करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. अशातच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (8 मे) औरंगाबादेत स्वाभिमान सभा होणार आहे. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न ''लोकशाही''ने केला. त्यानुसार औरंगाबादकरांना नामांतर नकोय तर पाणी हवंय, असे उत्तर आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ८ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा, औरंगाबादकरांना काय हवं? पाणी की नामकरण (संभाजीनगर)? असा सर्व्हे लोकशाहीकडून करण्यात आला होता. यामध्ये लोकशाही यूट्यूब वर (https://www.youtube.com/c/lokshahinews) विचारलेल्या प्रश्नावर हजारो नागरिकांनी मत नोंदवली. यामध्ये 68 टक्के नागरिकांनी औरंगाबाद शहरात पाणी हवंय म्हटले आहे. तर 32 टक्के नागरिकांनी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे संभाजीनगर नामांतर झाले पाहिजे असे म्हटले आहे.
नामांतरही महत्वाचा
औरंगाबादकरांचा जिव्हाळ्याचा विषय पाणीच आहे. परंतु नामांतराचा मुद्दाही अनेकांना महत्वाचा वाटत आहे. तब्बल 32 टक्के नागरिकांनी पाण्यापेक्षा नामांतरला महत्व दिले आहे. यामुळे आज मुख्यमंज्ञी उद्धव ठाकरे काय घोषणा करतील, याकडे लक्ष लागले आहे.
तर लोकशाहीच्या ट्विटर (https://twitter.com/news_lokshahi) 81.8 टक्के नागरिकांनी औरंगाबाद शहरात पाणी हवंय असे म्हटले आहे. तर 18.2 टक्के नागरिकांनी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे संभाजीनगर नामांतर झाले पाहिजे असे म्हटले आहे.