लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. मंगळवारी सहा वाजल्यापासून चॅनेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता LOKशाही मराठीने प्रक्षेपणबंदीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टात LOKशाहीने याचिका दाखल केली आहे. मराठी वृत्तवाहिनी लोकशाहीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 30 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.