महाराष्ट्र

घर का भेदी लंका ढाये! ड्रग्स विक्रेत्यांना स्थानिक व्यक्तीचा सपोर्ट; रात्रीच पोलिसांनी टाकला छापा

नवी मुंबईतील खारघरमध्ये पोलिसांनी रात्रीच्या छाप्यात 20 नायजेरियन ड्रग्स विक्रेते आणि 27 लाखांचे ड्रग्स हस्तगत केले. स्थानिक व्यक्तीने घर भाड्याने दिल्याने पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले आहे.

Published by : shweta walge

नवी मुंबईतील खारघर मध्ये नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ड्रग्स विक्रेते 20 नायजेरियन आणि 27 लाख रुपयांचे ड्रग्स केले हस्तगत.

या कारवाईत ड्रग्स विक्रेते नायजेरीयन नागरिकांना स्थानिक व्यक्तीने आपल्या घरात भाड्याने ठेवल्याचे समोर आले आहे.त्याच घरात ड्रग्स आणि दारूची पार्टी सुरू असताना पोलिसांनी रात्रीच्या अंधारात छापा टाकला असता,जवळपास 27 लाख रुपयांचे मिफेड्रॉन ड्रग्स आणि दारूचा साठा सापडला.

सर्वांना ताब्यात घेतले असून यात घर भाड्याने देणाऱ्या व्यक्तींना आरोपी केले असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

मात्र पुन्हा एकदा कोणतीही शहानिशा न करता केवळ जास्तीचे पैसे घेऊन घर भाड्याने देऊन ड्रग्स विक्रेत्यांना स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी याबाबत असा घर मालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result