सूरेश काटे |कल्याण | विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या पुढाकाराने आगरी कोळी व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आले.
दिवसेंदिवस आगरी कोळी मच्छीमारांची संख्या कमी होत आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने, आगरी कोळी बांधवांसाठी कायमस्वरूपी मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी लाखो मच्छीमारांना परवाना मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश मिळाले आणि आज कल्याणमध्ये आगरी कोळी समाज्याच्या हजारो नागरिकांना आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते परवाने वाटण्यात आले आहेत.