महाराष्ट्र

वैद्यनाथ मंदिर संस्थानला धमकीचं पत्र; 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवून देवू

Published by : Lokshahi News

बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीस प्राप्त झालेल्या पत्रा नंतर एकच खळबळ उडालीय. या पत्रात वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर.डी.एक्स ने मंदिर उडवून देवू या आशयाचा उल्लेख आहे.

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव असून त्यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रा नंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय. या धनंजय मुंडे म्हणाले की, गृहमंत्री ,तसेच दहशतवादी विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून,पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील.

Shubham Lonkar: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक

Baba Siddiqui: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश, आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, हृदयात ब्लॉकेज

'इतर राज्यातून येऊन मुंबईत केलेली दादागिरी आम्ही खपवून...' बाबा सिद्दीकी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

Mumbai Metro: आता महामुंबई मेट्रोसाठी नवी सेवा उपलब्ध! व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार बुकिंग; कशी ते जाणून घ्या...