इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथील शिंदेमळा भागात मंगळवारी रात्री चारच्या सुमारास बाळू किसन शिंदे यांच्या घराजवळील शेळी शेडमधून बिबट्याने तेरा शेळ्या फस्त केल्या होत्या. यानंतर वनविभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिसरात पिंजरा लावला.
यानंतर आज मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. आता नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.