राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे
भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागूप, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबईच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. कोल्हापुरात आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.