महाराष्ट्र

Worli Hit And Run: वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणातील शिंदे गटातील नेता पोलिसांच्या ताब्यात

वरळी येथे हिट अँड रन अपघाताची घटना घडली आहे. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वाहानाने धडक दिली.

Published by : Dhanshree Shintre

वरळी येथे हिट अँड रन अपघाताची घटना घडली आहे. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वाहानाने धडक दिली. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्यासोबत असलेला पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे वाहन चालकाने आपल्या वाहनासह घटनास्थळावरुन पलायन केले. पोलीस फरार चालक आणि त्याच्या वाहनाचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर मिहीर शहाने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेनंतर परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीला धावले. महिलेला तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना महिलेला मृत घोषित केलं. वरळी पोलिसांनी याप्रकरणी मिहीर शहा आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार काही थांबवली नाही आणि त्याने कार दामटली. त्यात कोळी महिलेला फरफटत गेली. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय