महाराष्ट्र

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर आणि शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

Published by : Dhanshree Shintre

उज्ज्वला रौंधळ | कोल्हापूर: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर आणि शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.

राहुल गांधी हे 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

खासदार राहूल गांधी यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल

4 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग कोल्हापूर विमानतळ शाहू नाका, शिवाजी विद्यापीठ, कावळा नाका, धैर्यप्रसाद चौक, एस.पी. ऑफीस चौक, भगवा चौक, कसबा बावडा, सायंकाळी 6:00 वाजता, कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम, 05 ऑक्टोबर दुपारी 1:00 वाजता, हॉटेल सयाजी येथून राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी, कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, दुपारी 1:30 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ राजर्षि छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर , सायंकाळी 4:00 वाजता हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी