Navneet Ravi rana  Team Lokshahi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यावरील कारवाई बेकायदेशीर;वकील रिझवान मर्चंट यांचा दावा

Published by : left

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अटकेची करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा दावा वकील रिझवान मर्चंट यांनी केला आहे. त्यासोबतच बेकायदेशीर अटक करण्यात आल्याने राणांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज(शनिवार) खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईवर बोलताना राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट म्हणाले, राणा दाम्पत्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे. पोलिसांनी कारवाई मागे घ्यावी असेही त्यांनी म्हटले. तसेच बेकायदेशीर अटक केल्याने राणांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे. राणांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. तसेच पोलिसांनी 41 A ची नोटीस राणांना का दिली नाही असा सवाल देखील रिझवान मर्चंट यांनी उपस्थित केला.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती