सीईटी परीक्षेची (CET Exam 2022) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (Maharashtra State Common Entrance Test Cell) MHT CET 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. याआधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. पण आता 15 एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. या mhtcet2022.mahacet.org संकेतस्थळावरून अर्ज करु शकतात.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी संस्थांमध्ये MHT CET द्वारे प्रवेश दिला जातो. (MHT CET 2022) PCM आणि PCB या दोन ग्रुपमध्ये आयोजित केले जाते. जे विद्यार्थी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकणार नाहीत, ते 16 ते 23 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज सादर करू शकतात. विलंब शुल्क 500 रुपये भरावे लागतील. 11 ते 28 जून 2022 या कालावधीत तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी MHT CET घेण्यात येईल. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा देखील होणार आहे. म्हणून यावेळी MHT CET 2022 जूनमध्ये आयोजित केली आहे.