विशाल मोरे, मालेगाव
लासलगाव बाजार समितीत लेव्हीचा मुद्दा तापला असल्याचे पाहायला मिळत आहे. माथाडी कामगार व मापारी यांचा लासलगाव बाजार समितीत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
व्यापारी व कामगारांमध्ये लेव्ही तसेच मजुरीच्या प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. मनमाड पाठोपाठ लासलगाव बाजार समितीतही माथाडी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
कामगार व मापारी कामावर हजर असताना देखील त्यांना मजुरीची रक्कम मिळत नसल्याने माथाडी कामगारांचे लासलगाव बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मजुरीची रक्कम मिळत नसल्याने कामगार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.