महाराष्ट्र

Monsoon Update | विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. त्यातच, आता विक्रोळीतील पंचशील नगर येथे घरांवर झाडे उन्मळून दरड कोसळली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यात, विशेषत: किनारपट्टी भागांत पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशातच मुंबईत मुसळधार पावसाला (Monsoon update) सुरुवात झाली असून ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. त्यातच, आता विक्रोळीतील पंचशील नगर येथे घरांवर झाडे उन्मळून दरड कोसळली आहे. यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत करण्यात येत आहे.

दरम्यान, काल सायंकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले चाकरमनी आज रेल्वे फलाटावरच अडकून पडले असून मध्य, पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहे.

मुंबई सह उपनगरात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा