अनेकदा आपल्या कुठे जायच असेल आणि आपण लोकलने प्रवास करायचा विचार केला तर लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अशातच जर लोकलचे दरवाजे अडवणाऱ्यांमुळे याचा आपल्याला अधिक त्रास होतो. असाच एक प्रकार विरार-दादर लोकलमधील महिला डब्यात घडला आहे. विरार-दादर लोकलमधील महिला डब्याचे दरवाजे महिला प्रवाशांनी अडवून ठेवल्यामुळे काही सहप्रवाशांनी त्यांना चोप दिला आहे. आणि या प्रकारचा व्हिडीओ बुधवारी समोर आला असून आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रवासी इंद्रजीत चौबे यांनी हा ट्विट केला आहे. विरार-दादर लोकलमधील महिला डब्याचे दरवाजे महिला प्रवाशांना अडवून ठेवल्यामुळे काही प्रवाशांना राग अनावर झाला. आणि परिणामी शाब्दिक वाद होऊन त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले.
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी लोकलमधील दरवाजे अडवणाऱ्या विरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर दरवाजे अडवणाऱ्या प्रकरणावर सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरली होती. आता हे प्रकार पुन्हा होत असल्याने मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि खारकोपर मार्गावरील दरवाजे अडकवून ठेवणाऱ्या प्रवाशांवर पुन्हा कारवाई करण्याची गरज भासलेली आहे.
अनेकदा लोकलमधील सीटवरून भांडण होत असते. दरम्यान पश्चिम रेल्वेने महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १२ डब्यांच्या लोकलमध्ये अकराव्या डब्यातील काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला असून ८ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे लोकलमध्ये चौथा डबाही महिलांसाठी उपलब्ध झाला आहे. या डब्यातील काही भाग महिला प्रवाशांसाठी २४ तास राखीव असणार आहे. आणि जर या डब्यातून पुरुष प्रवाशांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.