महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापूरात मुसळधार पाऊस; पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरुच आहे. जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा घट्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंचगंगा नदीची 43 फूट पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापुरातील पावसामुळे 81 बंधारे पाण्याखाली गेली आहे. 10 राज्य मार्गांसह 68 मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशे नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News