महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिसूनचा आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएसी आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अध्यक्ष पदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निंबाळकर यांचा कार्यकाळ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे.