Kirit Somaiya Team Lokshahi
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवात किरीट सोमय्यांनी वाजवला ड्रमसेट

आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासह किरीट सोमैय्यांनी गरबा प्रेमींसह केले नृत्य

Published by : shamal ghanekar

हर्षल भदाणे पाटील | पनवेल : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी काल रात्री खारघर पनवेलमधील तसेच खारघर येथील अनेक नवरात्र उत्सवाला हजेरी लावली. खारघर येथील लोटस सोशल वेलफेअर असोशिएनच्या गरबा महोत्सवात दोन वर्षांनंतर सर्व गरबाप्रेमींचा उत्साह पाहून किरीट सोमैय्या यांना सुद्धा गरब्याच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, असोशिएनचे सर्वेसर्वा कीर्ती नवघरे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, अमर उपाध्याय, माजी नगरसेविका आरती नवघरे, नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्यासह गरबा रसिकांसमवेत गरबा नृत्य केले. एवढ्यावरच किरीट सोमय्या थांबले नसून त्यांनी रंगमंचावर येऊन गरबा महोत्सवात दांडियाच्या पूर्ण बँडसोबत ड्रमसेट वाजवण्याचाही मनमुराद आनंद लुटला.

सोमय्यांसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनीही वाद्य वाजवण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आयोजनाचे तोंड भरून कौतुक करून गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव देखील तितक्याच उत्साहाने साजरा करीत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. तसेच विजयादशमीला रावण दहन करण्यासोबतच महाराष्ट्राला जो शाप आहे त्या भ्रष्टाचारी भस्मासूराचे देखील दहन करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

खारघरच्या लोटस वेलफेअर असो.चे यंदाचे पहिले वर्ष आहे तरी इतक्या मोठ्या संख्येने गर्दी जमली. पनवेलच्या नवरात्र उत्सवांना मुंबईचा नवरात्र उत्सव सुद्धा फिका पडेल असे अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली याचं कौतुक वाटतं, असेही किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी लोटस सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून भाजपने ते किरीट सोम्या आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले.

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू