Kirit somaiya  Team Lokshahi
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांना कोणतीही मोठी जखम नाही, सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल समोर

Published by : Shweta Chavan-Zagade

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी (23 एप्रिल) झालेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. किरीट सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात किरीट सोमय्या याची जखम 0.1 सेमीचा कट आहे. यासोबत सूज नव्हती आणि रक्तस्रावही नव्हता असं भाभा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर न्यायालयीन सुनावणीत राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली.

मात्र, या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चपलांचा पाऊस बरसवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले.

सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होतं. या जखमेची मोठी चर्चाही झाली. अखेर रुग्णालयाचा अहवाल आला आहे.

किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. त्यांच्यावर जमावाने खार पोलीस ठाणे परिसरात हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी सोमय्यांची तक्रार नोंदवून घेतली. यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत महत्वाची माहिती समोर आली आहे.

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर