लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता किरण सामंत यांच्या व्यक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. किरण सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा - राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे.
किरण सामंत यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता किरण सामंत यांनी राजापूर विधानसभेसाठी दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहे.