Raigad Khalapur IRSHALWADI Village Landslide 
महाराष्ट्र

Khalapur Irshalgad Landslide : खालापुरमध्ये दरड कोसळली, 30 ते 35 घरं मलब्याखाली

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (इरसालगड) इथं दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

रायगड - भारत गोरेगावकर : रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता खालापूर तालुक्यातील इरसालगड या गावातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली आहे.

50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा जीव गेला असल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत. काही अद्यापही खाली अडकलेले आहेत. अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरसालगड येथे ही घटना घडली आहे. इथे एकूण 46-50 घरं आहेत . 25 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुख्यमंत्री सातत्याने संपर्कात असल्याचं सांगत निसर्गासामोर कोणाचं काही चालत नाही, असंही ते म्हणाले.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, या गावात मोठ्या प्रमाणा गाई म्हशीसुद्धा ढीगाऱ्याखाली अडकले आहेत. तर, 60 पेक्षा अधिक लोक ढीगाऱ्याखाली अडकले आहेत. 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सतत पाऊस असल्याकारणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इरसालगड  येथे जाण्यास रवाना झाले आहेत. तर उदय सामंत आणि दादा भुसे याठिकाणी पोहोचले आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती