प्रशांत जगताप | जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठार उद्या बुधवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.कोरोनामुळे गेल्यावर्षी कास पठार पर्यटकांना पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र संसर्ग आटोक्यात आल्यानंतर कास पुष्प पठार सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुले करण्यात येणार असून कोरोनाचे नियम पाळत ऑनलाइन बुकिंगने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. हंगाम पर्यटकांना खुला करण्यासाठी व पदाधिकारी निवड करण्यासाठी नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली होती. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला होता.
कोरोनामुळे गेल्यावर्षी कास पठार पर्यटकांना पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. बुधवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.कास पुष्प पठारावरील प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे.यासाठी 100 रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येणार आहे.