महाराष्ट्र

"हरलो तरी चालेल परंतू भाजप सोडणार नाही"

Published by : Shweta Chavan-Zagade

अमझद खान | कल्याण : संघर्षाच्या काळात नगरसेवक होणार की नाही हे माहित नाही. हरलो तरी चालेल परंतू भाजप सोडणार नाही असे कार्यकर्ते आहेत. हीच भाजपची खरी संपत्ती आहे. हीच संपत्ती आपण जिल्ह्यात टिकवून ठेवली. याचा मला फार मोठा अभिमान आहे विधान भाजप नेते आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

सत्ता बदलानंतर भाजप रविंद्र चव्हाण यांचे डोंबिवलीतील त्यांच्या कार्यालयानजीक जोरदार स्वागत करण्यात आले. कल्याण डोंबिवली निवडणूक लवकर होणार आहे. सरकार स्थापनेपूर्वी राजकीय घडामोडी घडत होत्या. भाजप कार्यकत्र्यामध्ये चलबिचल होती. काही नगरसेवक भाजपला रामराम करुन शिवसेनेत गेले. नंतर सत्ता बदल झाला आणि आज भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. सत्ता बदलाच्या घडामोडीत डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांची महत्वाची भूमिका होती. शिंदे गटासोबत ते सूरत आणि गुहाटीला गेले. त्यानंतर गोव्याला गेले. मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधीनंतर ते डोंबिवलीत परते. सत्ता स्थापनेत त्यांची महत्वाची भूमिका असल्याने डोंबिवलीत आमदार चव्हाण यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज पार पडली.

सावरकर रोडवरील जाणता राजा या कार्यालयात असंख्य कार्यकत्र्याच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, भाजप पदाधिकारी गुलाबराव करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक मंदार हळबे, मंदार टावरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थि होते. यावेळी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी कार्यकत्र्याना संबोधित केले. हिंदूत्व आणि विकास या दोन मुद्यांना घेऊन आपणास पुढे जायचे आहे. इतकेच नाही तर नाण्याच्या दोन्ही बाजू कळत असताना सर्व आमिषांमध्ये जो टिकून राहिला तो भाजपच्या सच्चा कार्यकर्ता आहे यावर चव्हाण यांनी भर दिला.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू