Kalpita Pimpale  
महाराष्ट्र

पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी कल्पिता पिंपळे यांची नियुक्ती

Published by : left

हर्षल भदाणे पाटील, पनवेल | ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे (Kalpita pimple) यांची पनवेल महापालिकेच्या (Panvel Mahapalika) उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आज आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते.

कल्पिता किशोर पिंपळे (Kalpita pimple) यांनी यापूर्वी सर्वप्रथम २०१० ते ऑगस्ट २०१४ यादरम्यान अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर ऑगस्ट २०१४ ते जून २०१७ यादरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जुलै २०१७ ते डिसेंबर २०२० यादरम्यान नगरपरिषद प्रशासन संचालनालय सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर २३ डिसेंबर २०२० ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि निर्भीडपणे निभावली.

पनवेल महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांची पदोन्नती होऊन नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथे सहाय्यक आयुक्त गट अ पदी येथे त्यांची झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result