मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या ४२ आंदोलकांना आर्थित मदत तसंच सरकारी नोकरी देण्याच्या निर्णयाची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
२२ जणांच्या कुटुंबीयांनी एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असल्याचं देखिल राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. इतर २० आंदोलकांच्या कुटुंबीयांनी नोकरीचा अधिकार राखीव ठेवला असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांना १० लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातील वारसांना शुक्रवारी १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आलं. तसंच नोकरीदेखील देण्यात आली आहे.