महाराष्ट्र

फक्त पाच वर्ष काम करा, आयुष्यभर कमवा, पगार एक लाख! पाहा नक्की काय आहे?

सोशल मिडियावर सध्या एक जाहिरात जोरदार व्हायरल होत आहे. 288 पदे भरण्याची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत गडगंज पगार आणि अनेक सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे म्हटले आहे.

Published by : shweta walge

सोशल मिडियावर सध्या एक जाहिरात जोरदार व्हायरल होत आहे. 288 पदे भरण्याची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत गडगंज पगार आणि अनेक सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे म्हटले आहे. पाच वर्षांसाठी ही नोकरी आहे. त्यानंतर आयुष्यभर पेंन्शन आणि इतर सुविधा मिळणार आहे. ही जाहिरात सध्या खूप व्हायरल होत आहे. एका दैनिकात आलेली ही जाहिरात आहे. परंतु जाहिरात कोणी दिली, त्या व्यक्ती किंवा संस्थेचे नाव यामध्ये नाही.

2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पारर्श्वभूमीवर ही अनोखी जाहिरात आहे. आमदारांना मिळणारे फायदे आणि त्यांच्यावर होणारा खर्च या जाहिरातीत दिला आहे.

काय आहे जाहिरात

महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत. आमदार म्हणून फक्त ५ वर्षे जॉब करा. त्यानंतर आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही. या पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही. शिक्षण झाले नसेल तरी चालणार आहे. गुन्हे असले तरी चालणार आहे. नियमित काम केले नाही तर चालणार आहे. तसेच कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी चालणार आहे. १ लाख ९० हजार असणार आहे.

आमदारांना मिळालेल्या सुविधा दिल्या जाहिरातीत

आमदारांना मुंबईतील आमदार निवासात फ्लॅट मिळतो. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. म्हणजेच आमदारांना राहण्यासाठी मोफत निवास स्थान मिळेल असे जाहिरातीत म्हटले आहे.

आमदारांना विधिमंडळाच्या कँटीनमध्ये स्वस्तात फक्त २०/- रुपये जेवण मिळते.

आमदारांना फोनसाठी १५,०००/- भत्ता दिला जातो. त्याचा उल्लेख जाहिरातीत आहे. तसेच विनामूल्य ३ टेलिफोन मिळतात.

आमदारांना ५० हजार युनिट्स मोफत वीज दिले जाते. तसेच चार हजार लीटर पाणी कोणतेही पैसे न भरता देण्यात येणार आहे. कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विनामूल्य असणार आहेत. मोफत पेट्रोल मिळणार आहे.

रेल्वेत पहिल्या एसी (फस्ट एसी) अमर्यादीत प्रवास किमान ५ वर्षांसाठी मिळणार आहे.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यावरच चा संदर्भात देत जाहिरातीत म्हटले आहे की, एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेन्शन योजना हमखास भेटणास आहे. प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी २००० अतिरिक्त पेन्शन आहे. कपडे धुवायला रोज ६०० रुपये मिळणार आहे. रोजचा भत्ता २००० रुपये आहे. फर्निचरसाठी एक लाख रुपये आहे. ऑफिस खर्च ६०,०००/- महिना तसेच इतर अनेक फायदे निवड २०२४ पासून सुरू होईल. आमदार व्हा. आपल्या बरोबरीने आपल्या नातू पणतू यांचे पण भविष्य उज्ज्वल करा, असे जाहिरातीत म्हटले आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय