लोकशाही न्यूज नेटवर्क
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (12 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एक शेर ट्विट करत पडळकरांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे 'कुत्रा' असा केला आहे.
जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवारांच्या हस्ते उद्या होणार होते, मात्र त्या आधीच गोपीचंद पडळकरांनी या पुतळ्याचे अऩावरण केले. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचे उद्घाटन होऊ नये. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होईल, अशी टीका त्यांनी केली होती.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विनाशकाले विपरित बुद्धी, अशी प्रतिक्रिया दिली. तर, जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत पडळकरांवर टीका केली आहे. 'गोपीचंद पडळकर… तजुर्बे ने शेरों को खामोश रहना सिखाया; क्योंकि दहाड़ कर शिकार नहीं किया जाता; कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; मगर जंगल का सन्नाटा शेर की मौजूदगी बंयाँ करता है' असे ट्विट त्यांनी केले आहे.