महाराष्ट्र

Jitendra Awhad : चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याचं रिटर्न गिफ्ट त्यांना मिळालंय

Published by : Siddhi Naringrekar

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याचं रिटर्न गिफ्ट त्यांना मिळालंय.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान मुंबईत येऊन महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनवण्याच्या घोषणा करतात, परंतु महाराष्ट्राला निधी देण्याची वेळ आल्यावर मात्र तोंडाला पाने पुसली जातात. महाराष्ट्रातील फुटीरवाद्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय आणलं? उत्तर: ठेंगा! अर्थसंकल्प सुरू असतानाच आज शेअर बाजार कोसळला, ही एकच गोष्ट बजेटचा अर्थ काढण्यासाठी पुरेशी आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम