Jitendra Awhad  
महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांच खोचक मीम; चंद्रकांत पाटलांना हाणला टोला

Published by : left

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North By Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. या विजयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्याविरोधात ट्विट करत त्यांना खोचक टोला लगावला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांच्या पाठिशी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद उभी होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. खुद्द चंद्रकांत पाटील (chandrakant patil) कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. यावेळी चंद्रकांत पाटील (chandrakant patil) प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोष करण्यात आला. दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी तिथून काढता पाय घेतला.

याच घटनेला धरून जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी खोचक मीम ट्वीट करत चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये “फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा विजय… कोल्हापूरची जागा जिंकली… शाहू महाराज की जय”, असं ट्वीट केलं. त्याच्याच पुढच्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी एक मीम शेअर केलं आहे. या मीममध्ये चंद्रकांत पाटील (chandrakant patil) मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती