महाराष्ट्र

‘या’साठी शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला… जयंत पाटील यांनी केलं स्पष्ट

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलंय. दोन्ही नेत्यांमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावर तर्क लढवले जात आहेत.

महाराष्ट्रातील राजकारण, शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा, स्वतंत्र सहकार खातं आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राज्यातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्द्यांचे अंदाज बांधले जात होते. मात्र, शरद पवारांनी नेमकी कशासाठी पंतप्रधानांची भेट घेतील होती, याविषयी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारण स्पष्ट केलं आहे.

जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं. "देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले", असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त

बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाने का…; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने चर्चांना उधाण

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त

भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात; विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी