महाराष्ट्र

Jammu & Kashmir: कुंजवाणी-रत्नुचक येथे आढळला ड्रोन; 24 तासांत दुसरी घटना

Published by : Lokshahi News

जम्मूमधील कुंजवाणी-रत्नूचक येथे सोमवारी रात्री पुन्हा एकदा ड्रोन आढळल्याची माहिती समोर आली आहे. या भागात सलग तिसऱ्यांदा, विशेष म्हणजे २४ तासांत दुसऱ्यांदा ड्रोन सापडला आहे. सोमवारी हे ड्रोन कालूचक मिलिट्री स्टेशनजवळ दिसले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कुंजवाणी-रत्नूचक येथे ड्रोन आढळल्याची माहिती मिळत आहे.

ड्रोन उंचावरून हवेत उडत होता आणि यावेळी त्यातून पांढरा प्रकाश पडतांना दिसत होता. दरम्यान, गृह मंत्रालयाने जम्मू हवाई दल स्टेशनकडे या हल्ल्याचे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवले आहे. या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्करी आस्थापनांमध्ये ड्रोन अँटी-गनसह कमांडो तैनात करण्यात आले आहेत. धोका लक्षात घेता कुठेही ड्रोन उडताना पाहून प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सर्व सैन्य मुख्यालय, तुकडी, छावण्यांमध्ये सैनिकांना सतर्क राहण्याच्या सूचनेसह सज्ज राहण्यास सांगितले गेले आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का