मुंबई : महाराष्ट्रात जलयुक्त शिवार महत्वाचं आहे. कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु होत आहे. पहिला टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. ते पुण्यात बोलत होते.
महाराष्ट्रात जलयुक्त शिवार महत्वाचं आहे. कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही. मागच्या काळात जलयुक्तशिवार सारखी योजना चालवली. आणि २० हजार गावांमध्ये जलसंधारण कामे केली. यामुळे ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढला. मोठ्या प्रमाणात दोन पीक घेता आली. आता ती योजना पुन्हा सुरु करत आहोत. जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु होत आहे. पहिला टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
यावेळेस हवामान तज्ञांनी काही अंदाज दिले त्यानुसार अलनिनो संदर्भात काही सांगितलं आहे. त्यामुळे हे वर्ष अलनिनो असेल तर जलसंधारण करावं लागणार आहे. पाणी साठवावं लागणार आहे. त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. ४० हजार शेतकऱ्यानं पाणी फाउंडेशनने सामावून घेतलं आहे. पाणी फाउंडेशन सारख्या ज्या ज्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आताही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावेळी जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा कार्यन्वित करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार योजना 25 हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.