जळगाव: गणेशोत्सवानंतर सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात 1 हजार 500 रुपये तर चांदीच्या भावात 3 हजारांची घसरण झाली आहे.
आज जळगाव सुवर्णनगरी सोन्याचे भाव जीएसटीसह 59 हजार रुपये तर चांदीचे भाव जीएसटीसह 70 हजार रुपये झाले आहे. सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याने सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.