नांदेड : सीआरपीएफच्या जवानांना crpf jawan कुठलीही जबाबदारी दिली तरी ते ती चांगल्या पध्दतीने हाताळतात असे काैतुक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे सीआरपीएफच्या जवानांचे केले. सीआरपीएफच्या सैनिकांच्या बलिदानाने देश सुरक्षित असल्याचे सांगत देशाची अंतर्गत सुरक्षित अबाधीत असल्याचे गृहमंत्र्यांनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्य़ातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दल येथील मैदानात एक कोटीवावे वृक्ष आज लावण्यात आले. या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्य़ातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दल येथील मैदानात एक कोटीवावे वृक्ष आज लावण्यात आले. देशात एक कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. देशातील विविध कॅम्पमध्ये 99 कोटी 99 लाख 99 हजार 999 वृक्ष लावण्यात आली होती. आज शहा यांच्या हस्ते एक कोटीवं पिंपळाचं वृक्ष लावण्यात आले आहे.यावेळी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह केंद्रीय राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.