Devendra Fadnavis Team Lokshahi
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मराठावाडा वॉटर ग्रीडची सरकारडून हत्या

औरंगाबादनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जल आक्रोश मोर्चा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी वॉटरग्रीडची योजना आखली. पण, या सरकारनं मराठवाडा वॉटरग्रीडचा खून केला, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर सोडले आहे. औरंगाबादनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जल आक्रोश मोर्चा (Jal Akrosh Morcha) काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालनाकरांचा आक्रोश या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर आला आहे. जालन्यात पाणी पाहायला मिळत नाही. आमचेही ठरलंय जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. म्हणूनच जिथे जलआक्रोश आहे तिथे भाजप आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळं माता-भगिनींना पाणी मिळत नाही. हा मोर्चा सरकारला जागं करण्यासाठी आहे. हे सिंहासन मिरवण्यापुरता नाही. जनतेच्या समस्या सोडविणार नसाल तर तुम्हाला तेथे बसण्याचा अधिकार नाही.

आमचे सरकार असताना मराठवाडा पाणी योजना आखली होती. एकाही गावामध्ये पिण्यातच्या पाण्याची कमतरता पडणार नाही. यासाठी मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी वॉटरग्रीडची योजना आखली. पण, या सरकारनं मराठवाडा वॉटरग्रीडचा खून केला. तर जलयुक्त शिवारची योजना यांनी बंद केली. सगळ्या योजनांची हत्या करण्याचं काम या सरकारनं केलं. हे महाआघाडीचं सरकार आल्यावर यांनी वैधानिक मंडळाची हत्या केली. हे सत्तेवादीमध्ये खुश आहेत हे मालपाणीत खुश आहे.

अडीच वर्षात या सरकारनं फुटकी कौडी पण दिली नाही. या सरकारनं मराठाड्यातील विकासाच्या सवलती काढून टाकल्या. चालू उद्योगाची या सरकारनं सबसिडी काढून टाकले. हर घर जल ही केंद्र सरकारची योजना मोदीजींनी दिली. 35 हजार कोटींपैकी 500 कोटी पण या सरकारनं खर्च केले नाहीत. एकेक दिवस तुमचा दिवस भारी करू, हा मोर्चा ही सुरुवात आहे. जोपर्यंत दररोज पाणी येत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष करत राहिल, असेही फडणवीस यांनी म्हंटला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव