महाराष्ट्र

”चिपी विमानतळाच्या उड्डाणाचा मुहूर्त ठरला”

Published by : Lokshahi News

गेली अनेक वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी नवा मुहूर्त सापडला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चिपी विमानतळ प्रवासी विमान उड्डाणास सज्ज झाला आहे. ९ ऑक्टोबरला १२ वाजता विमानतळाच उद्घाटन होणार आहे. तसेच पहिलं विमान मुंबईला टेकऑफ करणार आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.

9 ऑक्टोबर रोजी होणार दुपारी 12 वाजता विमानाचा टेक ऑफ होईल. 1 वाजून 10 मिनिटाने सिंधुदुर्गात विमानात उतरेल. 1.35 वाजता मुंबई करता पुन्हा टेक ऑफ होईल. एअर अलायन्स कंपनीच्या माध्यमातून हा प्रवास होईल. 72 सीट असलेलं हे विमान मुंबईत 6 तारखेलाच आलं आहे. एक एअरक्राफ्ट पुढच्या आठवड्यात आणलं जाईल. सिंधुदुर्ग आणि मुंबईकरांना सोयीस्कर वेळ ठरेल अशीच वेळ अदानी ग्रुपशी चर्चा करून घेतली आहे. मी एअर अलायन्सला भेटून विमानतळ सुरू करण्यास सांगितलं. त्यांनी 7 ऑक्टोबरपासून विमान उड्डाण सुरू करायला तयार आहोत असं सांगितलं होतं. तसं पत्रं दिलं होतं. त्या पत्राची माहिती सर्वांना दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच असं काही नाही, असंही म्हटलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे. चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या.

गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आलं. या एअरपोर्टवरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचं निश्चित झालं. कालच उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत सकाळी 11 वाजता चर्चा केली. आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं राऊत म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत