इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे. 2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलं होतं. क्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाणार आहे. ही भारताची पहिली समर्पित 'पोलरिमीटर' मोहीम आहे.1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता इस्रो इतिहास रचणार आहेया मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.
XPoSAT उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे. आज 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी XPoSat या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. एक्सपोसॅट उपग्रह हा पृथ्वीच्या 500 ते 700 किलोमीटरच्या कक्षेत फिरत राहणार आहे.
हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करणार आहे. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेनं बनवली आहे. ही भारताची पहिली समर्पित 'पोलरिमीटर' मोहीम आहे. ही मोहीम 5 वर्षाची असणार आहे.