विरारमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एक नवजात मुलीला बिल्डिंगच्या टेरेस वरून खाली फेकण्यात आले आहे.
विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. स्थनिक नागरिकांनी बाळाला एका कपड्यात गुंडाळून नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र हे नवजात बाळा कोणी फेकलं, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. अर्नाळा सागरी पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.