पेट्रोल, डिझेलच्या (Petrol, diesel) दरात रोज वाढ होत आहे. त्याचा परिणाम रोजच्या दैनंदिन वस्तू होत आहे. जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या आहे. सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. त्यातच आता राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कासोबत रेडीरेकनरच्या दरात (Ready Reckoner Rate) वाढ केली आहे. रेडीरेकनरच्या दरात जिल्ह्यात सरासरी ३.२९ टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्यात आजपासून 1 एप्रिल रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर रेडिरेकनरच्या दरात (Ready Reckoner Rate) सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता घर (home) घेणेही महागणार आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रात 8.1 टक्के वाढ, ग्रामीण भागात 6.96 टक्के आणि नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आलेली आहे.
राज्यातील पालिका क्षेत्रात 8.80 टक्के, ग्रामीण भागात 6.96 टक्के तर नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रेडीरेकनरचे दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक 13.12 टक्के वाढ मालेगाव पालिका क्षेत्रात झाली आहे. तर, सर्वात कमी वाढ हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 12.38 टक्के, पिंपरी-चिंचवड क्षेत्रामध्ये 12.36 तर पुणे महापालिकेतील हद्दवाढ करण्यात आलेल्या 23 गावांमध्ये 10.15 टक्के वाढ झाली आहे. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न महागणार आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होण्याची शक्यता आहे.
मुंबईत रेडिरेकनरचा दर काय?
मुंबई महापालिका क्षेत्रात रेडिरेकनरच्या दरात 2.34 टक्क्यांनी वाढ झाली. मुंबई शहर व उपनगरात सदनिकांचे व्यवहार अधिक होत असतात. त्यामुळे जमीन दर, सदनिकांचा दर यांचे गुणोत्तर अधिक आहे. त्यामुळे सदनिका दरातील वाढीच्या 50 टक्केच वाढ ही जमीन दरात घेण्यात आली आहे.
मुंबई, पुण्यातील काही भागातील रेडिरेकनरमध्ये घट
मुंबईमध्ये तब्बल 864 झोनमध्ये रेडीरेकनर दरात 20-22 टक्क्यांनी घट झाली. पुणे शहरामध्ये 8 झोन मध्ये रेडीरेकनर दरात 10 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. पुणे शहरामधील 8 झोन मध्ये रेडीरेकनर दरात 10 टक्क्यांनी घट झाली आहे.