महाराष्ट्र

दिवाळीत फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ

दिवाळीच्या सणासाठी फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. वाहन कर, इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाचे वाढलेले भाव यामुळे यंदा फटाक्यांचा आवाजही महागला आहे. मुंबईतील विक्रते सांगतात की सर्वच प्रकारच्या फटाक्यांच्या साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणूका आणि दिवाळीचा सण एकत्रच आला असला तरी वाहन कर, इंधन दरवाढ, फटाक्यांसाठी लागणार्या कच्च्या मालाचे वाढलेले भाव यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाजही महागला आहे. फटाक्यांची बाजारपेठ सज्ज झाली असली तरी किंमतीमध्ये मात्र १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

दीपोत्सवाचे कुतूहल आबालवृद्धांपासून सार्यांनाच असते. या सणासाठी बाजारपेठटा सज्ज झाल्या आहेत. 'प्रकाशाचा सण' असलेलेल्या या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे फटाके, परंतु गतवर्षी प्रमाणे यंदाही फटाक्यांवर महागाईचे सावट असल्याचे दिसून येते. सर्वच प्रकारच्या फटाक्यांच्या साहित्याच्या दरामध्ये सरासरी १० ते १५ टक्के वाढ झाली असल्याचे मुंबईतील विक्रते सांगतात. देशात शिवाकाशी (तामिळनाडू) गावात फटाक्याची मोठी बाजारपेठ असून तेथेच उत्पादन होते, तेथून भिवंडी बाजारपेठेत फटाके येतात. मुंबईतील बहुतांश घाऊक विक्रेते भिवंडी येथून सर्व प्रकारचे फटाके आणतात. फटाक्यांचा दर्जा आणि आवाजाच्या बाबतीत शिवाकाशीच्या फटाक्याला ग्राहकांची सर्वाधिक मागणी असते असते. भायखळा, काळाचौकी, मशिद बंदर परिसर परेल, दादरसह उपनगरात फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत. गेल्या आठ

दिवसापासूनच या स्टॉलवर गर्दी असल्याचे दिसून येते.

किटकॅट, पेन्सिल (स्मॉल) व बिगसह रॉकेट बिग, कॅक्लिगं स्पार्कलला (३० ग्रॅम) बाजारात ग्राहकांडून मागणी आहे. १२ सेंटिमीटरमध्ये ४ कलर स्पार्कलआहेत. याचबरोबर १ हजार नग अस लेली फटाक्यांची माळ ही २५० रुपये, दोन हजारांची माळ ५०० रुपये, तीन हजारांची ९०० रुपये व ५ हजारांची १२०० ते १४०० रुपयांना आहे.

विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमती

-फुलबाजा मोठा बॉक्स - २५० रुपये, लहान बॉक्स- २०० रुपये • लाल फटाके : ६० रुपये माळ नागगोळी, १० रुपये पाकिट • चिटपूट बॅक्स १५० रुपये • झंपर (बेडूक उड्या) : ११० रुपये मियाँबीबी (फायटर): २०० रुपये लहान पोपट (कुर्मी कलर) ३० रुपये • मोठे पोपट (कुर्मी कलर) ६० रुपे

-डबल बार : ७० रुपये

- भुई चक्कर (२५ नग) : १५० रुपये • भुई चक्कर मोठे : ४०० रुपये • मोठी कुंडी (१० नग) : १४०० रुपये

- मोठी मातीची कुंडी : (५ नग) २५० रुपये • सुतळी बॉम्ब ९० ते २५० रुपयांपर्यंत • रॉकेट (१० नग) : २५० रुपये

- रॉकेट मोठे : (१० नग) ४५० रुपये) • छोटे फवारे: २५०ते ४०० रुपयांपर्यंत • फॅन्सी वस्तु मोठ्या : ३५० रुपये

-बंदूक ५० ते ६५० रुपयांपर्यंत

NCP(SP) Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

Nashik Babanrao Gholap: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! बबनराव घोलप पुन्हा एकदा स्वगृही

NCP(SP) Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

Purandar Vidhansabha | पुरंदरमधून विजय शिवतारेंची उमेदवारी निश्चित; भाजप कडून भरणार अर्ज ?

Kishor Jorgewar: अखेर किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश