अनिल ठाकरे, चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील बंदी उठवून दारू सुरु करण्यात आली आले. मात्र, दारू सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म समिती गठीत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बंदी हटविण्यात आल्यानंतर जिल्ह्यात खून, बलात्काराच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्याती दारू माफिया, कोळसा माफिया, वाळू माफिया राज सुरु आहे. त्यामुळं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सक्रिय होऊन गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी वकिलांची फौज उभी करावी.रस्त्यांवर वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना राज्याचे गृहमंत्री यांच्या लक्षात आणून दिली आहे. भाजपने तसे पोलीस विभागाला निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारांना पोलीस पाठीशी घालत आहेत का, पोलीस विभागात भ्रष्टाचार वाढला आहे काय, या सर्व प्रकारात कोणत्या नेत्यांचा हात आहे, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.