महाराष्ट्र

आयकर विभागाचे उत्तर महाराष्ट्रात धाडसत्र; 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त

Published by : Lokshahi News

आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रात धाडसत्र सूरू केले आहे. यामध्ये 175 अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर असून, आतापर्यंत 31 ठिकाणी कारवाई करत 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली.

उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यात 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिन्यांचाही समावेश आहे.

175 अधिकाऱ्यांची एकाचवेळी धाडजमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले आहेत. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी 22 गाड्यांमधून 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले होते. इतकी अफाट संपत्ती जमवली कशी आणि आतापर्यंत याकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती