महाराष्ट्र

नागपुरात आज होणार महासोहळा; पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

या कार्यक्रमाची नागपूर शहर आणि परिसरात जय्यत तयारी केली आहे. उद्घाटन सोहळ्याच्या परिसरात शिंदे-फडणवीस यांचे मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या सोहळ्याला अनेक मंत्री-आमदार आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहतील. नागपूर रेल्वे स्टेशनची ऐतिहासिक वास्तू सजावण्यात आली आहे. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल. यावेळी ते नागपूर-विलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

शिर्डीतही भव्य तयारी करण्यात आली आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी विशाल असे सभामंडप उभारण्यात आले आहे. विकासगंगा आली हो अंगणी अशा मजकुराचे भव्य बॅनर्स शिर्डीत लावण्यात आले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडा दाखवला जाणार आहे. यामुळे नागपूर स्टेशनवरही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. समृद्धीचा झिरो माईल ते वायफळ टोल नाकापर्यंत भव्य सजावट करण्यात आली आहे. नागपूरमध्ये सुमारे १० किलोमीटरपर्यंत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे झेंडे फडकवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव