महाराष्ट्र

जंगलात वनकर्मचाऱ्यांना आढळला मानवी हाडाचा सांगाडा

Published by : Lokshahi News

वर्धा | भूपेश बारंगे : वर्धा-नागपुर सिमेवर असलेल्या सोमलगड बीट क्र.२५५ मधे असलेल्या परिसरात शेतात वन विभागाचे चमूला गश्ती दरम्यान आज सकाळी ७ वाजता दुर्गंधी येत असल्याने जाऊन बघितले असता विखुरलेले मानवी शरिराचे हाडे आढळून आले. शोधाशोध घेतला असता मृतक हा अशोक दौलत उईके (५५) राहणार सेलडोह असल्याचे त्याचे पत्नी व मुलांने सांगितले.

मृतक अशोक उईके हा अनेक वर्षापासून घरुन १५-१५ दिवस बेपत्ता राहत असायचा त्यानंतर परत येत असे. म्हणून कुटुंबियांनी पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली नाही. सांगण्यात येते की अशोक ठेक्याने केलेल्या शेतात असलेल्या झोपडीत तर अनेकदा शेतात असलेल्या झाडाखाली जंगलात दरी करुन राहायचा. सकाळी वन विभागातील वनरक्षक निशा चौधरी,अशोक वाटकर,दिलीप पारसे व गणेश बोंडे हे सोमलगड परिसरात गस्त घालत असताना घटना उघडकीस आली.

मृतकाचा दोन तीन वर्षा अगोदर झालेल्या अपघातात याचा पाय मोडला असल्याने त्याचे पायात रॉड टाकण्यात आला होता. त्याचे पत्नी व मुलाने हा अशोक उईके असल्याचे सांगितल्याने ओळख पटली. झोपडीत दुपट्टा, स्वेटर,ब्लँकेट,माचीस,गुल्लेर व तीन डब्यात जिवनावश्यक वस्तू आढळून आल्या.सदर घटनेची माहिती निशा चौधरी यांनी केळझर वन परिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाचपोर व वनरक्षक सपना शेंदरे यांना दिली असता त्यांनी सिंदी पोलीसांना भ्रमणध्वनीने माहिती देण्यात आली. सिंदी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे,पोलीस उप निरिक्षक जयेंद्र नगराळे व दिलीप कडू,बळवंत पिंपळकर व संदीप सोयाम पोलिस पाटिल योगराज कोहरते यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

पत्नीने ओळखला पतीचा हाडाचा सांगाडा

दीड ते दोन वर्षांपूर्वी अपघातात पतीचा पायात रॉड टाकण्यात आला होता.आज हाडाचा सांगाडा आढळला त्यात रॉड आढळून आला याची माहिती पत्नी व मुलाला देण्यात आली घटनास्थळी पाहणी केली असता हाडाचा सांगाडा माझ्या पतीचा असल्याचे सांगण्यात आले.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result