महाराष्ट्र

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी तसेच प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार केला जात आहे.

Published by : Dhanshree Shintre

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी तसेच प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार केला जात आहे. त्यामुळे 17 मे ते 2 जूनपर्यंत त्या ठिकाणी ब्लॉक करण्यात आला आहे. त्याचा परिणाम नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावर धावणाऱ्या मेल, ट्रेनवर होणार आहे.

या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील अनेक एक्सप्रेस दादर आणि पनवेलपर्यंत चालवण्यात येणार आहेत तर काही लोकल ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. या विशेष ब्लॉक दरम्यान भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध नसेल.

दादर स्थानकात रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्सप्रेस

22224 साईनगर शिर्डी - सीएसएमटी वंदे भारत

12533 लखनऊ - सीएसएमटी पुष्पक

11058 अमृतसर - सीएसएमटी

11020 भुवनेश्वर - मुंबई कोणार्क

12810 हावडा - सीएसएमटी मेल

12052 मडगाव - सीएसएमटी जनशताब्दी

22120 मडगाव - सीएसएमटी तेजस

12134 मंगलोर - सीएसएमटी

12702 हैदराबाद - सीएसएमटी हुसैन सागर

12810 हावडा - सीएसएमटी

पनवेलपर्यंत चालवण्यात येणाऱ्या गाड्यांची माहिती

10104 मडगाव - सीएसएमटी मांडवी पनवेलहून सुटणारी एक्सप्रेस 17 ते 19 मे दरम्यान पनवेल स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल.

20111 सीएसएमटी - मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस 17,18,19 मे रोजी पनवेल स्थानकावरून सुटेल.

मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या विशेष रात्रकालीन ब्लॉकमुळे मेल-एक्सप्रेससोबतच लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच घरातून बाहेर पडावे. जेणेकरुन गैरसोय होणार नाही.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका