राज्य सरकारने अखेर अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार 11 वी प्रवेशात एकवाक्यता येण्यासाठी सरकार वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा घेणार आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे 10 वी निकाल आता शाळांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार घोषित करण्यात येणार आहेत. याचा परिणाम 11 वीच्या प्रवेशावरही झालाय. त्यामुळे इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी सीईटीची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, "सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.