परभणी | मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर पसलेली दिसते.या दाट धुक्यात परभणीकर हरवून जातायेत. मागील 3 चार दिवसापासून सूर्यदर्शन ही झालं नाही आहे. आज भल्या पहाटे पासून परभणीत दाट धुक्याची चादर पसरली होती.
पहाटे फिरायला येणारी मंडळी या धुक्यात हरवून गेल्याच बघायला मिळाले. निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. परभणी शहरात साडे सात वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरलेली असते.
तर दिवस भर थंड गार वाऱ्याबरोबर ढगाळ वातावरण राहत आहे, तर रात्रीला कडाक्याची थंडी पडत आहेत. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे खोकला, सर्दी आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.