महाराष्ट्र

कल्याण पूर्वेत एमआयडीसी पोलिसांची कारवाई; 36 लाखांची पाणी चोरी उघड

Published by : Lokshahi News

कल्याण पूर्वेतील  मलंग रोड वरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीतून बेकायदेशीररित्या नळ जोडणी करून पिण्याचे पाणी चोरी करणाऱ्या दोन सोसायटींवर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे  अनधिकृत कनेक्शन घेत पाणी चोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

 कल्याण पूर्वेतील हाजी मलंग रोड वर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे 1200 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी अनधिकृत पणे पाणी कनेक्शन घेत पाणी चोरी होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

मलंग रोड वरील अडीवली ढोकली येथील निर्मला पार्क सोसायटीने जून 2016 ते ऑगस्ट 21 पर्यंत तर शिवशाही इनक्लेव बिल्डींग सोसायटीने फेब्रुवारी 2020 पासून ते ऑगस्ट 2021 पर्यंत बेकायदेशीररित्या नळ जोडणी करून सुमारे 36 लाख रुपये किमतीचे पाणी चोरी केल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही सोसायटी विरोधात पाणी चोरी चा गुन्हा दाखल केला आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती